Home अहमदनगर अहमदनगर: जिल्ह्यात सरपंच निवडीच्या तारखा जाहीर

अहमदनगर: जिल्ह्यात सरपंच निवडीच्या तारखा जाहीर

Sarpanch election dates announced in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सरपंचपदाच्या निवडी अखेर पार पडणार आहेत. जिल्ह्यातील सरपंच पदाच्या निवडी ९ आणि १० फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या दोनही दिवशी जिल्ह्यातील ७५८ गावांमध्ये निवड प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक तालुक्यात ९ तारखेला निम्या व १० तारखेला निम्या गावांचे सरपंच निवडले जाणार आहे. यासाठी प्रशासन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रिया जानेवारी मध्ये पार पडलेली आहे. जानेवारीलाच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.  ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार निकाल लागल्या नंतर एक महिन्याच्या आत सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्यात यावे असा आदेश आहे. यानुसार १५ फेब्रुवारीच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला. ९ आणि १० तारखेला सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Sarpanch election dates announced in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here