Home अहमदनगर Ahmednagar: प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा केला खून

Ahmednagar: प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा केला खून

Ahmednagar wife murdered her husband with the help of her boyfriend

अहमदनगर | Ahmednagar: नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे प्रियकरासोबत असलेल्या संबंधामुळे अडचण निर्माण होत असल्याने पत्नीने पतीला जबर मारहाण करीत पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजगाव येथील रहिवासी असलेली विवाहित महिला अनिता प्रमोद कोरडे हिचे बाळासाहेब बावडकर याच्याशी प्रेमसंबंध होते. यामुळे अनिता हिने तिच्या पतीस प्रमोद बाळासाहेब कोरडे याच्या डोक्यात व शरीरावर लोखंडी फुकनीने  बेदम मारहाण केल्याने प्रमोद ह्याच्या डोक्याला जबर मार लागून मेंदूतून रक्तस्त्राव झाला. त्याला उपचारासाठी विखे पाटील या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना प्रमोद याची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी प्रमोदचा भाऊ श्रीकांत बाळासाहेब कोरडे यांनी भावाचा केल्याप्रकरणी अनिता कोरडे व योगेश बावडकर यांच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

डीवायएसपी जाधव व पोलीस निरीक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोसई मोरे हे करीत आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.  

Web Title: Ahmednagar wife murdered her husband with the help of her boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here