Home अहमदनगर पूर्ववादातून मारहाण करीत घरासमोरील टेम्पो व दुचाकी दिल्या पेटवून

पूर्ववादातून मारहाण करीत घरासमोरील टेम्पो व दुचाकी दिल्या पेटवून

Ahmednagar tempo and the two-wheeler in front of the house were set on fire

अहमदनगर | Ahmednagar: निर्मल नगर येथील रेणाविकर कॉलनीतील अंकुश मधुकर जाधव वय ३१ यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून त्याच्या घरासमोरील टेम्पो, स्कुटी, सुजकी मोटारसायकल आग लावून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नुकसान करणाऱ्या महेश उर्फ वारी वाल्हेकर याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्व वादातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहित अशी की, फिर्यादी अंकुश जाधव वा आरोपी महेश वाळेकर या दोघांत २ जानेवारी रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास नगर औरंगाबाद रोडवरील रिलायंस पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकत असताना वाद झाला यातून आरोपीने फिर्यादीस तुझ्याकडे पाहून घेईन असा दम दिला व शिवीगाळ केली.

दिनांक ३ जानेवारी रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घरासमोरील टेम्पो, स्कुटी व सुजकी मोटारसायकल या वाहनांना अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. ही आग आरोपीने लावली असल्याचा फिर्यादीचा संशय असल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.पी. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला आहे.  

Web Title: Ahmednagar tempo and the two-wheeler in front of the house were set on fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here