Home अहमदनगर दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी जेरबंद, एक पसार

दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी जेरबंद, एक पसार

Shrirampur Five accused arrested in preparation for the robbery

श्रीरामपूर | Shrirampur: नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील नार्दन परिसरातील भुयारीमार्गाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

त्यांच्याकडून सुरा, मिरचीपूड कटावणी, चार मोबाईल, दोन दुचाकी असा एक लाख ३ हजार ५५० रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

सराईत गुंड आजम शेख हा आपल्या साथीदारांसह दोन दुचाकीवरून गोपीनाथनगर परिसरात दरोड्याच्या तयारीत जात असल्याची माहिती कटके यांना मिळाली होती. यावरून भुयारी रेल्वे मार्गाजवळ सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एका आरोपीने पलायन केले आहे.

आरोपी रियाज शेख वय २४, आजम शेख वय २८, करण अनचीते वय २२, बाबर शेख वय ४५ सर्व रा. श्रीरामपूर, दानिश पठाण वय २० रा. संगमनेर यांना अटक करण्यात आली आहे.  

Web Title: Shrirampur Five accused arrested in preparation for the robbery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here