Home महाराष्ट्र ‘दुसरे दादा सत्यजीत दादा’ विधानभवनात जोरदार घोषणाबाजी, शपथविधी सोहळा

‘दुसरे दादा सत्यजीत दादा’ विधानभवनात जोरदार घोषणाबाजी, शपथविधी सोहळा

Satyajeet Tambe | Nashik Graduate Election: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनात आज पार पडला.

Satyajeet Tambe swearing-in ceremony of the newly elected MLAs of the Legislative Council

मुंबई : विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनात आज पार पडला. यावेळी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या समर्थकांनी ‘दुसरे दादा सत्यजीत दादा’ अशी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळं विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित दादाही चर्चेत आले आहेत.

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीमुळं नाशिकची निवडणूक रणधुमाळी ठरली. यामध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराचा पराभव झाला.

पाच जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जे उमेदवार विजयी झाले. त्यांचा आमदारकीचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. या कार्यक्रमाला विरोधीपक्ष नेते अजित पवारही उपस्थित होते. यावेळी विक्रम काळे आणि सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांनी ‘पहिले दादा अजित दादा आणि दुसरे दादा सत्यजीत दादा’ अशी घोषणाबाजी केली. तसेच ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या सत्यजीत तांबे पाया पडले. यानंतर चव्हाण यांनी हस्तांदोलन करत त्यांचं अभिनंदन केलं.

Web Title: Satyajeet Tambe swearing-in ceremony of the newly elected MLAs of the Legislative Council

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here