Home महाराष्ट्र आ.सत्यजीत तांबे यांची अनोखी शपथ चर्चेत,  वडील सुधीर तांबे, म्हणाले..

आ.सत्यजीत तांबे यांची अनोखी शपथ चर्चेत,  वडील सुधीर तांबे, म्हणाले..

Satyajeet Tambe: अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेली शपथ चर्चेत.

MLA Satyajeet Tambe's unique oath in discussion

मुंबई:  विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनात आज पार पडला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेली शपथ चर्चेत आहे. इतर सदस्य आपले वरिष्ठ नेते आणि श्रेष्ठींची नावे घेत असताना आमदार सत्यजीत तांबेंनी मात्र सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची नावे घेतली. तसेच त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून शपथ घेतली. यानंतर सत्यजीत तांबेंचे वडील, माजी आमदार सुधीर तांबे यांनी हा शपथ घेतानाचा व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

सुधीर तांबे (Sudhir Tambe Tweet) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून सत्यजीतने आज विधानपरिषद सदस्यपदाची शपथ घेतली. मला विश्वास आहे की, सत्यजीत या पदाला योग्य न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सत्यजीत, तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.”

दरम्यान शपथविधीनंतर सत्यजित तांबेंची प्रतिक्रीया, यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवरील आपली नाराजी बोलून दाखवली. महाराष्ट्रातील युवकांचा आवाज होण्याचा प्रयत्न करणार, असं तांबे म्हणाले. शपथविधीवेळी थोरात साहेब हजर असते तर आनंद झाला असता, असंही तांबेंनी सांगितलं.

Web Title: MLA Satyajeet Tambe’s unique oath in discussion

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here