Home भंडारा I ‘ m sorry Mom! मेसेज पाठवून विद्यार्थिनीने संपविले जीवन

I ‘ m sorry Mom! मेसेज पाठवून विद्यार्थिनीने संपविले जीवन

Suicide News:  बारावीच्या एक विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवलं.

Suicide News I'm sorry Mom! A student ended her life by sending a message

भंडारा: महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे बारावीचे प्रात्यक्षिक पेपर सुरु आहेत आणि दुसरीकडे बारावीच्या एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. आजीकडे शिक्षणासाठी असलेल्या या तरुणीने असं का केलं याचं कारण अद्याप समोर आले नाही. वडिलांच्या निधनानंतर या तरुणीने आजीचं गाव गाठलं. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आजीकडे शिक्षणाचे धडे गिरवत होती. मात्र अचानक तिच्या एका निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं.

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचं नाव आहे. ती भंडारामधील तुमसरमध्ये आजीकडे राहत होती. तुमसरमधील हसारातील मातोश्री विद्या मंदिरात ती बारावी विज्ञान शाखेत शिकायला होती. तर तिची आई नागपूर जिल्ह्यातील कामठी इथे राहायची.

‘आय एम सॉरी..लव्ह यू मम्मी’ असा मेसेद पाठवून त्या तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला ओढणीने गळफास घेतला. सकाळी नात रुमच्या बाहेर का येतं नाही या चिंतेने खिडकीतून खोलीत बघितले..खोलीतील दृष्यं पाहून मावशी, आजीच्या पायाखालची जमीन सरकली.

Web Title: Suicide News I’m sorry Mom! A student ended her life by sending a message

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here