Home महाराष्ट्र शाळेतील वॉचमनने दोन चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार  

शाळेतील वॉचमनने दोन चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार  

school watchman sexually assaulted two children

Latur Crime | लातूर: शहरातील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत्तील शाळेत एक किळसवाना प्रकार घडला आहे. शाळेतील कर्मचाऱ्याच्या वासनेला दोन मुली बळी पडल्या असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचारन्हवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शहरातील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार (sexually assaulted) केल्याची घटना समोर आली आहे.

या शाळेतील नराधम वॉचमन याने मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास शाळेत खेळणाऱ्या ६ वर्षांच्या दोन मुलींना चॉकलेट आणि मोबाईल देण्याच्या बहाण्याने वॉशरुमकडे नेले आणि दोघीसोबत  अश्लिल कृत्य केली. मुलींनी घरी आल्यानंतर घडला प्रकार आईला सांगितल्यानंतर आईच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सापोनि दिपाली गिते या करित असून आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. आंबाजोगाई रोडवर असलेल्या एका शाळेतील चपरासी याने पीडित मुलीस तुला सरांनी बोलावले असल्याचे सांगून ग्रंथालयाजवळ नेले आणि तुला वर्गात मॉनिटर बनवितो असे सांगत तिच्याशी अश्लिल चाळे केले. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील नराधम सेवकास अटक करण्यात आली आहे. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच ही दुसरी घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: school watchman sexually assaulted two children

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here