Home महाराष्ट्र प्रेमप्रकरणातून दोघींची हत्या करून वाहनचालकासह अल्पवयीन मुलीची आत्महत्या

प्रेमप्रकरणातून दोघींची हत्या करून वाहनचालकासह अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Suicide of a minor girl along with the driver by murder both of them in a love affair

मुंबई : कांदिवलीतील बंद असलेल्या रुग्णालयात डॉक्टरची पत्नी व मोठ्या मुलीची निर्घृण हत्या (Murder) करून वाहनचालक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातील वाहनचालकाकडून सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केली असून, पुढील तपास सुरू आहे. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून सुरू असलेल्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे.

किरण आशिष दळवी (४५), मुस्कान दळवी (२४), भूमी दळवी (१७) आणि वाहनचालक शिवदयाळ सेन (६०) असे हत्या आणि आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. कांदिवली (प.), बँक ऑफ इंडियासमोर, रघुवंशी डेअरीच्या पाठीमागे राधाबाई दळवी हॉस्पिटल आहे. ते काही वर्षांपासून बंद असून, या रुग्णालयात डॉक्टर दळवी यांचे कुटुंब राहत होते. तसेच त्यांच्यासह त्यांचा वाहनचालक आरोपी शिवदयाळ हादेखील राहत होता. बुधवारी रात्री ११.२२ वाजेच्या दरम्यान कांदिवली पोलिसांना मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, दळवी रुग्णालयात एक इसम कोयता घेऊन फिरत आहे. ही माहिती मिळताच कांदिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावरील लोखंडी शटरचे कुलूप लावल्याचे दिसून आले. शटर तोडून पोलीस आत गेले असता त्यांना रक्ताचा सडा दिसून आला. पोलिसांनी मागोवा काढत दुसऱ्या माळ्यावर गेले असता त्या ठिकाणी पॅसेजमध्ये रक्ताच्या थारोळ्यात किरण दळवी या जखमी अवस्थेत  मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी गच्चीवरील स्वयंपाक घरात धाव घेतली असता त्या ठिकाणी मुस्कान दळवी ही जखमी अवस्थेत दिसून आली. तसेच पोलिसांनी पहिल्या माळ्यावर धाव घेतली असता एका खोलीचा आतून दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तो दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्या खोलीत आरोपी वाहनचालक शिवदयाळ व डॉक्टर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी भूमी या दोघांनी एकाच दोरीला गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी चारही जखमींना पुढील उपचारासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांना शिवदयाळ सेन याच्या पॅण्टच्या खिशातून चार सुसाईड नोट्स सापडल्या. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे हत्याकांड वाहनचालक आणि डॉक्टरची अल्पवयीन मुलगी यांच्यातील प्रेमप्रकरणातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. १० वर्षापासून दळवी कुटुंबासह राहत असलेला चालक शिवदयाळ याचे डॉक्टरच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. त्यामुळे त्याने तिघांची हत्या करत आत्महत्या केल्याचे एका सुसाईड नोटमध्ये उल्लेख असल्याचे म्हटले जात आहे. आई आणि मोठ्या बहिणीचा प्रेमाला विरोध होता. म्हणूनच प्रथम आई आणि बहिणीची हत्या केल्यानंतर शिवदयाळ व अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. डॉ. आशिष दळवी हे मध्य प्रदेश येथे मुलासह राहत असून, त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते मुंबईत दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Suicide of a minor girl along with the driver by murder both of them in a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here