Home संगमनेर संगमनेर तालुक्यात जेष्ठ नागरिकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

संगमनेर तालुक्यात जेष्ठ नागरिकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

senior citizen drowned in a farm in Sangamner taluka

Ahmednagar | Sangamner | संगमनेर: तालुक्यातील सावरगावतळ येथील एका जेष्ठ नागरिकाचा शेततळ्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान घडली. सोपान मारुती नेहे वय 65 वर्ष  असे जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावरगावतळ येथे गट नं  655 मध्ये त्यांचे स्वतःच्या मालकीचे  शेततळे आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान ते पाण्यासाठी  आपली मोटार चालू करण्यासाठी गेले असता कागदावरून पाय घसरून ते शेततळ्यात पडले. पहाटेची वेळ आणि जवळपास कोणीही नसल्याने तसेच त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मोटार चालू करून बराच वेळ होऊनही ते घरी पुन्हा माघारी का येईना म्हणून त्यांचा मुलगा बाबासाहेब त्यांना पाहण्यासाठी गेला असता ते शेततळ्यात पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी आजूबाजूच्या व्यक्तींना मदतीला बोलाविले असता वैभव नेहे आणि इतर ग्रामस्थ मदतीला धावून आले आणि तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे उपचारासाठी नेत असतांनाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना समजली असता पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन  पाहणी केली.  उत्तम रामचंद्र गोडसे यांच्या खबरी वरून अ.मृ. रजी. 67/2022 सी.आर.पी.सी. 174 नुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  पांडुरंग पवार मार्गदर्शनाखाली पो.हे काँ एस. एस. पाटोळे अधिक तपास करत आहे. सोपान नेहे यांनी राजाराम नेहे पाटील दूध संस्था वि.का.सेवा सोसायटी संचालक म्हणून  काम केलेले आहे. त्यांच्या अकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: senior citizen drowned in a farm in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here