Home पुणे लग्नासाठी पाहुण्या आलेल्या सात मुली धरणात बुडाल्या, दोघींचा मृत्यू

लग्नासाठी पाहुण्या आलेल्या सात मुली धरणात बुडाल्या, दोघींचा मृत्यू

Pune News:  खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना, सात मुली बुडाल्या (drowned) पाच जणींना स्थानिकांनी वाचवले असून दुर्दैवाने दोघींचे मृतदेह सापडले.

Seven girls who were wedding guests drowned in the dam, two died

पुणे: पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त गावात आलेल्या नऊ मुलींपैकी सात जणी धरणातील पाण्यात उतरल्या होत्या. यामधील सात मुली बुडाल्या होत्या. परंतु पाच जणींना स्थानिकांनी वाचवले असून दुर्दैवाने दोघींचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मूळ बुलढाण्याच्या रहिवासी असलेल्या नऊ मुली या खडवासला येथे लग्न कार्यासाठी आल्या होत्या. लग्न कार्यालयाचा मंडप हा धरणाच्या शेजारी होता. यावेळी खडकवासला धरणामध्ये मुली पोहोण्यासाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या सात मुली बुडत होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी पाच मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, तर दोन मुलींचा मृतदेह पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी पाण्याबाहेर काढला आहे. शासकीय रुग्णवाहिका १०८ घटनास्थळी दाखल होत्या.

Web Title: Seven girls who were wedding guests drowned in the dam, two died

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here