Home अहमदनगर ब्रेकिंग: प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, पोहोण्याचा मोह आवरता….

ब्रेकिंग: प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, पोहोण्याचा मोह आवरता….

Ahmednagar News:  प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या  युवकाचा नदीत बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना.

Youth who went swimming in Pravara river drowned

श्रीरामपूर | Shrirampur: प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या  युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असुन दोन दिवसांपासुन शोध मोहीम सुरु होती. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला आहे.

बेलापुर रामगड येथील जावेद इर्शादअली सय्यद (वय 40 रा. बेलापुर खु.) हा प्रवरा तिरावर गाडी धुण्याकरीता आला होता. गाडी धुतल्यानंतर त्याला प्रवरानदी पात्रात पोहोण्याचा मोह आवरता आला नाही. तो बेलापुर खूर्दच्या नावघाटावरुन पोहोत प्रवरा नदीच्या मध्यावर आला. परंतु त्याचा दम तुटल्यामुळे तो नदीत बुडाला.

बर्‍याच वेळाने हा युवक  बुडाल्याचे लक्षात आले. लगेच शोध मोहीम सुरु करण्यात आली. रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली. गावातील पट्टीचे पोहणारे तसेच अग्नीशामक दलाचे अधिकारी हेमंत कारले हे सात जणांच्या टिमसह तेथे पोहोचले. श्रीरामपुरचे  तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, मंडलाधिकारी सारिका वांडेकर, बेलापुर खूर्दचे कामगार तलाठी शिंदे, बेलापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते. गावातील पोहणारे तसेच अग्नीशामक दलाचे जवान यांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह प्रवरा नदीत सापडला. त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Youth who went swimming in Pravara river drowned

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here