Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जणांची नदीत आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जणांची नदीत आत्महत्या

Ahmednagar Suicide News:  एकाच कुटुंबातील सात जणांची नदीत आत्महत्या,  भीमा नदीत आत्महत्या.

Seven people of the same family committed suicide in the river

अहमदनगर:  जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जणांची नदीत आत्महत्या, मुलाने तरुणीला पळवल्याने पारनेरच्या निघोजमधील कुटुंबाची भीमा नदीत आत्महत्या ,  17 जानेवारीची घटना सातही जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह  आढळून आले. यामध्ये सासू-सासरे, जावई-मुलगी आणि तीन नातवंडांचा समावेश आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हे कुटुंबीय मूळचे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील असून ते मजुरीसाठी नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे आले होते.

मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडीत फुलवरे (वय २८ जावई), राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), रितेश ऊर्फ भैया श्याम फुलवरे (वय ०७), छोटू श्याम फुलवरे (वय ०५), कृष्णा श्याम फुलवरे (वय ०३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृतदेह सापडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पवार पती-पत्नी हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खामगाव येथील मूळचे आहेत. त्यांचे जावई श्याम फुलवरे व त्यांचे कुटुंबीय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. ते मजुरीसाठी निघोज येथे आले होते. त्या ठिकाणी एका वर्षापासून ते मोलमजुरीचे काम करत होते. या सर्वांचे मृतदेह पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीतील भीमा नदी पात्रात आढळून आले आहेत. या ठिकाणापासून नगर जिल्ह्याची हद्द जवळ आहे.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

पोलिसांच्या माहितीनुसार, पवार आणि फुलवरे कुटुंबीय हे वर्षभरापूर्वी निघोजमध्ये कामासाठी आले हेाते. हे सर्वजण निघोजमध्ये राहत होते. मात्र, पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात १८ जानेवारी एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा, ता. २१ जानेवारी रोजी पुन्हा एका महिलेचा मृतदेह, तर २२ जानेवारी पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पारगाव हद्दीत भीमा नदीत वरील चार मृतदेह आढळून आले, त्याच्या आसपासच आज (ता. २४ जानेवारी) पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. एका महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाईल आढळून आला. त्यावर संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांना दाखवून सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. या सर्व मृतदेहांचे पोस्टपार्टम यवत ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले आहे.

Web Title: Seven people of the same family committed suicide in the river

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here