Home क्राईम सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीला पाहून पोलिसांनाही धक्का

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीला पाहून पोलिसांनाही धक्का

Pune Sex Racket:  पिंपरी-चिंचवड मधील एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याची घटना.

Sex racket busted, police shocked to see the actress

पुणे: मुंबईत मागील काही दिवसांपुर्वी एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून एका प्रसिध्द भोजपुरी अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवताना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली होती. त्यातच आता पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून त्यामध्ये भोजपुरी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

या तिघांनी अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. पुणे पोलिसांना पिंपरी-चिंचवड येथी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी प्रबीर मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव या आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी या मुलींना जास्त पैशांचे आमिष देऊन वेश्याव्यवसायात अडकवले होते.

या सेक्स रॅकेटचे धागेदोरे लांब पर्यंत असण्याची शक्यता पोलिसांना आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Sex racket busted, police shocked to see the actress

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here