Home अहमदनगर शिर्डी हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय: एका प्रतिष्ठित महिलेस अटक

शिर्डी हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय: एका प्रतिष्ठित महिलेस अटक

Ahmednagar Sex Racket: शिर्डी येथे हायप्रोफाईल देह व्यापार चालत असलेल्या ६ लॉजवर छापा टाकत मोठी कारवाई केली होती. यातील एका हॉटेल/लॉजचे मालक असलेल्या राहुरी येथील एका प्रतिष्ठित महिलेस शिर्डी पोलिसांनी अटक.

Ahmednagar Sex Racket eminent woman was arrested

राहुरी : शिर्डी येथे हायप्रोफाईल देह व्यापार चालत असलेल्या ६ लॉजवर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी छापा टाकत मोठी कारवाई केली होती. यातील एका हॉटेल/लॉजचे मालक असलेल्या राहुरी येथील एका प्रतिष्ठित महिलेस शिर्डी पोलिसांनी अटक केली.

तिला राहता न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दि. ५ मे रोजी शिर्डी शहरात एकाच वेळी ६ लॉजवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक झाली होती. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या पोलिस फौजफाट्यासह मोठी कारवाई झाली. यामध्ये १ अल्पवयीन विदेशी मुलीची सुटका करण्यात आली.

सदर तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडे आला असता त्यांनी देहव्यापार चालणाऱ्या हॉटेल / लॉज मालकांवर पिटा व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करत अधिक चौकशीअंती हॉटेलमालकांच्या विरोधात ११ मे रोजी गुन्हा दाखल केला.

तीन हॉटेलमालकांना अटक झाली होती, तर आणखी तीनपैकी एक हॉटेल / लॉज मालक महिला राहुरीतील असल्याने त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले असता चौकशी केल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली.

Web Titie: Ahmednagar Sex Racket eminent woman was arrested

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here