Home अहमदनगर लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेळोवेळी सहा वर्ष अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेळोवेळी सहा वर्ष अत्याचार

Sexual abuse on young women from time to time for six years by showing the lure of marriage

अहमदनगर | Ahmednagar:  लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेळोवेळी अत्याचार (Sexual abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत युवती मुळची राहुरी तालुक्यातील व सध्या पारनेर तालुक्यात राहत असलेल्या पीडित युवतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार वैभव दत्तात्रय झिंजुर्डे (रा. अरणगाव ता. नगर, हल्ली रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) याच्याविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंगरगण (ता. नगर) व वेगवेगळ्या ठिकाणी सन 2016 ते 8 मे, 2022 दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला असून मंगळवारी (दि. 17) एमआयडीसी पोलिसांत पीडितेने फिर्याद दिली आहे. सन 2016 पासून वैभव झिंजुर्डे याने फिर्यादी युवतीसोबत लग्न करतो, तिला चांगले संभाळतो, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखविले. युवतीवर वेळोवेळी डोंगरगण व इतर ठिकाणी अत्याचार केला.

फिर्यादी युवती वेगळ्या जातीची असल्याने जातीवाद करून लग्न करता येणार नाही, असे म्हणत लग्न केले नाही.  पीडित युवतीने पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे करीत आहेत.

Web Title: Sexual abuse on young women from time to time for six years by showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here