Home अहमदनगर शिर्डी: साईच्या चरणी अर्पण केलं ४ किलो सोनं | Gold

शिर्डी: साईच्या चरणी अर्पण केलं ४ किलो सोनं | Gold

Shirdi offered 4 kg of gold at Sai

Shirdi | शिर्डी: अहमदनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक येत असतात. अनेक भाविक आपली मनोकामना बोलून दाखवतात तर काही भाविक मनोकामना पूर्ती झाल्याचे सांगत महागड्या वस्तू अर्पण करीत असतात.

काल हैदराबाद येथील एका साईभक्ताने तब्बल ४ किलो सोनं (Gold) साई चरणी अर्पण केलं आहे. हैद्राबाद येथील पार्थ सार्थी रेड्डी यांना २०१६ मध्ये साई बाबा चरणी सोन्याची पेटी दान करायची होती. परंतु त्यावेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तसेच कोरोना महामारीमुले दानप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे साई भक्त पार्थ रेड्डी यांनी आता ४ किलो सोन्याची पेटी दान केली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याच्या पेटीची किंमत २ कोटी एवढी आहे.

Web Title: Shirdi offered 4 kg of gold at Sai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here