Home अहमदनगर चार जणांची पोहण्याची पैज पडली महागात, एकाचा बुडून मृत्यू

चार जणांची पोहण्याची पैज पडली महागात, एकाचा बुडून मृत्यू

Swimming cost four people dearly, one drowned

कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यातील सुपे शिवारामध्ये तळ्यातील पाणीसाठ्यात बुडून युवकाचा मृत्यू (Drowned) झाल्याची घटना घडली आहे. दत्ता झुंबर उबाळे असे या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर बत्तीस तास उलटले तरी देखील अद्याप त्याचा मृतदेह सापडला नाही. मृतदेह शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शासकीय यंत्रणा सलग दुसर्‍या दिवशी प्रयत्न सुरु आहे.

सुपे गावाच्या शिवारामध्ये मंगळवारी चौघेजण पोहोण्यासाठी गेले होते. मित्रांमध्ये तळ्याच्या एका तीरावरून दुसर्‍या तीरावर जाण्याची पैंज लावण्यात आली होती. यात दम लागून दत्ता उबाळे याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. घटना घडल्यापासून पाण्यामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आजही दिवसभर प्रांत अधिकारी अजित थोरबोले तहसीलदार नानासाहेब आगळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्याचप्रमाणे शासकीय कर्मचारी नागरिक थांबून सापडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.

Web Title: Swimming cost four people dearly, one drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here