लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, फोटो शेअर करत लग्नही मोडले
Ahmednagar | अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून तरूणाने युवतीवर अत्याचार (Sexual abusing) केल्याची घटना समोर आली आहे. युवती गर्भवती राहिल्याने तरूणाने गर्भधारणा झालेले सोनोग्राफी अहवाल युवतीच्या होणार्या पतीला टाकून बदनामी केल्याची घटना घडली आहे.
यामुळे जमलेले लग्न देखील मोडले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदेव भाऊसाहेब हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या युवतीने फिर्याद दिली आहे.
1 नाव्हेंबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 या दरम्यान एमआयडीसी येथील साईबन परिसरात ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने सोमवार, 7 मार्च 2022 रोजी रात्री नगर तालुका पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून हराळ विरोधात अत्याचारसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हराळ याने फिर्यादी युवतीला लग्नाचे आमिष दाखविले. या आमिषाने युवतीवर अत्याचार (Sexual abusing) केला. अत्याचार केल्याने युवतीला गर्भधारणा झाली. त्याचे सोनोग्राफी रिपोर्ट काढण्यात आले. दरम्यानच्या काळात युवतीचे दुसर्या मुलासोबत लग्न जमले. हराळ याने युवतीसोबत लग्न जमलेल्या मुलाला सोनोग्राफी रिपोर्ट व्हाट्सअप व इन्स्टाग्रामवर पाठविले, बदनामी करत जमलेले लग्न मोडले.
तसेच हराळ याने युवतीला शिवीगाळ, दमदाटी करून तु जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जीवे ठार मारून टाकेल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित महिलेले सोमवारी, 7 मार्च 2022 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हराळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी हराळ याला अटक केली आहे. अधिक तपास सुरु आहे.
Web Title: Sexual abusing a young woman showing the lure of marriage