Home महाराष्ट्र शारिरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये लैंगिक...

शारिरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये लैंगिक अत्याचार

Sexual harassment in hotel rooms and in cars threatening to make sex videos viral

पुणे | Pune Crime: आंबे विकत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. या शारीरीक संबंधाचा व्हिडिओ (sex videos viral) बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत ईश्वर भटेवारा (वय २६, रा. प्रिनस्टन टाऊन सोसायटी, कल्याणीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार आरोपीच्या घरी तसेच वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये ९ एप्रिल २०२१ ते ९ एप्रिल २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अनिकेत भटेवारा याने फिर्यादी तरुणीला आंबे विकत देण्याच्या कारणाने घरी बोलावून घेतले. घरात कोणी नसताना त्याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. या शारिरीक संबंधाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शुट केले. हे फोटो व व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन फिर्यादी यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांच्याबरोबर आरोपी लग्न करणार असल्याने त्यांना आलेले स्थळ व त्यांचे लग्न ठरलेल्या मुलाला फिर्यादी यांनी त्यांच्या संबंधाविषयी सांगितले. त्याचा राग मनात धरुन अनिकेत याने फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन तुला बघून घेईल अशी धमकी देऊन लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करीत आहेत.

Web Title: Sexual harassment in hotel rooms and in cars threatening to make sex videos viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here