Home अहमदनगर मला आपल्याशी बोलायचं! नगरचे ठाकरे सरकारमधील एकमेव अपक्ष मंत्री साथ सोडणार का?

मला आपल्याशी बोलायचं! नगरचे ठाकरे सरकारमधील एकमेव अपक्ष मंत्री साथ सोडणार का?

Shankarao Gadakh: शंकरराव गडाख नेवासे तालुक्यात सोमवारी साधणार जनतेशी संवाद.

Shankarao Gadakh independent minister in the Thackeray government leave

अहमदनगर: शिवसेनेला पाठींबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहे. शिवसेनेला पाठींबा दिलेले, शिवसेनेने मंत्रिपद दिलेले शंकरराव गडाख हे राज्यातच होते. ते ना गुवाहाटीला होते, ना मातोश्री वर दिसले. आजारपणामुळे ते विश्रांती घेत होते.

सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यात नुकत्याच झालेल्या घडामोडी या पाश्र्वभूमीवर माजी मंत्री व नेवासा आमदार शंकरराव गडाख या सोमवारी नेवासे मतदार संघात कार्यकत्यांशी भेट्न संवाद साधणार आहेत. आमदार गडाख नेमके काय बोलतात याची उत्सुकता कार्यकत्यांना लागली. सोमवारच्या संवाद बेठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. गेल्या मंत्रिमंडळात आमदार गडाख जलसंधारणमंत्री होते. राज्याच्या राजकीय घडामोडीत गडाखांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. जलसंधारणमंत्री म्हणून गडाखांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पदही भूपवले. ठाकरे यांच्या राजीनाम्याने व मंत्रिमंडळ बदलल्याने गडाखांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले मंत्रिपदावर असतानाही गडाखांनी पदाचा डामडोल केला नाही, राजकीय पटलावरील घडामोडीनंतर गडाख मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे त्यांची ते उलगडून सांगतील. गडाखांनी सवादासाठी कार्यकत्यांना जनतेला साद घातली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गडाखांच्या भूमिकेला महत्त्व आहे. गडाखांना पुन्हा मंत्रिपदाची ऑफर असतानाही त्यांनी नेमकी धरलेली घाट से संवादाच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहेत.

Web Title: Shankarao Gadakh independent minister in the Thackeray government leave

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here