Home अहमदनगर पोलिसावर कोयत्याचा वार, पोलिसाचे एक बोट छाटले

पोलिसावर कोयत्याचा वार, पोलिसाचे एक बोट छाटले

Shevgaon A policeman's finger was cut off

Ahmednagar | Shevgaon | शेवगाव: जुन्या भांडणाच्या वादातून एकाने कोयत्याने वार करून दुसऱ्या गटातील चौघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. यावेळी घटनेतील आरोपीला पोलीस पकडून घेऊन जात असताना पहिल्या गटातील एकाने हल्ला केला त्यावेळी कोयत्याचा वार केल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे बोट तुटल्याची घटना कोळगाव ता, शेवगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार रविवारी रात्री घडला.

याप्रकरणी अण्णा तुकाराम खंडागळे (वय 55, रा. कोळगाव) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसाचे बोट छाटून जखमी केल्याप्रकरणी अर्जुन विठ्ठल खंडागळे (वय 48) व ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय 20) दोघेही रा. कोळगाव यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जबर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी हवालदार संदीप उबाळे यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला तर इतरांना नगर येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत लक्ष्मी थोरात यांच्या फिर्यादीत म्हटले आहे, जुन्या भांडणाच्या कारणावरून अण्णा खंडागळे याने वडील भगवान खंडागळे, आई पार्वती खंडागळे यांना तसेच नातेवाईक सुनील हिवाळे, मारिया हिवाळे व फिर्यादीस शिवीगाळ करून हातात कोयता घेऊन येऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून चौघांना गंभीर जखमी केले. या अगोदरही अण्णा खंडागळे याने अनेकवेळा आई वडिलांना मारहाण करून दहशत असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या फिर्यादीवरून अण्णा खंडागळे याच्या विरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत. जखमींना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तर हवालदार परशुराम नाकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली. त्यांनी त्वरीत सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मी व सहकारी संदिप उबाळे दोघे जण आरोपी अण्णा खंडागळे यास पकडून गाडीकडे घेवून जात होतो. त्याच वेळेस अर्जुन विठ्ठल खंडागळे याने त्याला सोडा मी त्याला जीवे ठार मारणार आहे, असे म्हणत कोयत्याने केलेला. हा वार हवालदार उबाळे यांच्या हाताच्या बोटावर झाला. यामध्ये त्यांचे एक बोट तुटले असून ते गंभीर जखमी (injured) झाले.

पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आरोपी अर्जुन खंडागळे, ज्ञानेश्वर खंडागळे (वय-20) व अण्णा खंडागळे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नाकाडे यांच्या फिर्यादीवरुन अर्जुन खंडागळे व ज्ञानेश्वर खंडागळे यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जबर जखमी केल्याचा गुन्हा (Crime filed) दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे करीत आहेत.

Web Title: Shevgaon A policeman’s finger was cut off

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here