Home अहमदनगर शिर्डी – विमानतळाच्या सुरक्षेला भगदाड

शिर्डी – विमानतळाच्या सुरक्षेला भगदाड

शिर्डी – विमानतळाच्या सुरक्षेला भगदाड

नऊ महिन्यांपूर्वीच म्हणजेच साई शताब्दीच्या प्रारंभी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी विमानतळ कार्यान्वित झाले. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाच्या वतीने समाधी शताब्धीचा त्यास मुहूर्त लाभला. आणि मुंबई आणि शिर्डी  येथून थेट शिर्डी पर्यंत विमान प्रवास सुरु झाल्याने साई भक्तांसह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले.

For Even More Information Check This: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0 to postponed release date 2019

परंतु अवघ्या नऊ महिन्यांतच विमान प्राधिकरण आणि राज्य सरकारने विमानतळाच्या केलेल्या नित्कृष्ट कामाचा पहिला पावसाने पर्दा फाश केला. काही दिवसांपूर्वी विमान धावपट्टी सोडून काही मीटर अंतर कापून मातीमध्ये रुतले गेलं. दुर्घटनेत विमानातील ५२ प्रवासी बालंबाल बचावले होते. त्यानंतर विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता विमानतळावर असलेली कुचकामी यंत्रणा सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारी घटना पुन्हा एकदा घडलीये.

काल झालेल्या पहिल्या पावसाने आणि वादळाने विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील सुरक्षा भिंत कोसळण्याची घटना घडलीये मात्र विमानतळ प्रशासनाला विमानतळ सुरेक्षेच गांभीर्य नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालय. भिंत कोसळून 15 तास उलटूनही अद्यापपर्यंत भिंत दुरुस्त झालेली नसल्याच चित्र दिसतंय. सुरक्षा भिंतीमध्ये अवघ्या तीन ते चार फुटावर मोठे भगदाड पडल्याने कुत्रे आणि इतर प्राण्यांसह कोणीही आतमध्ये सहज प्रवेश करू शकत. विमानतळाच्या मुख्य प्रवास द्वारा जवळ सी.आय.एफ. सारखी राष्ट्रीय यंत्रणा सुरक्षेसाठी जरी तैनात केली असली तरी विमानतळाचे क्षेत्रफळ पाहता हि यंत्रणा कुचकामी ठरणार हे संरक्षण भिंतीला पडलेल्या भगदाडावरूनच स्पष्ट होतंय.

For Even More Information Check This: Kaala box office collection

आंतरराष्ट्रीय दर्जेच्या असलेल्या शिर्डी विमानतळावर नित्कृष काम आणि कुचकामी सुरक्षा यंत्रणा असेल तर भविष्यात शिर्डी अंतरराष्ट्रीय विमानतळ नक्कीच मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देईल. त्यामुळे विमान प्राधिकरण आणि राज्य सरकारने योग्य उपाय योजना करून कमी कालखंडात साईबाबांच्या पवित्र भूमीतील या विमान तळाची प्रतिष्ठा जपावी एवढीच माफक अपेक्षा आहे.

संगमनेर अकोले तालुका न्यूज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here