Home अहमदनगर राहता – भरदिवसा १० लाखाचे दागिने धूमस्टाईल ने लंपास

राहता – भरदिवसा १० लाखाचे दागिने धूमस्टाईल ने लंपास

राहता – भरदिवसा १० लाखाचे दागिने धूमस्टाईल ने लंपास

सेवानिवृत्त कर्मचारी रखमाजी शिंदे वय वर्षे ६५ रा. त्रिशुल नगर राहता हे राहता येथील युनियन बँकेच्या शाखेत दुपारी ३ वाजल्यानंतर लॉकर मधले सोन्याचे दागिने घेण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून साडे एकतीस तोळे दागिने असलेले पिशवी घेतल्यानंतर तेथून ते जवळच असलेल्या दुकानाकडे नगर मनमाड महामार्गाकडे पायी जात असताना मागून मोटार सायकल वर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी हिसकवून घेतली आणि धूमस्टाईल ने चोरून नेली. आरडा ओरडा आणि लोक गोळा होईपर्यंत चोरटे धूमस्टाईल ने पसार झाले होते.

For Even More Information Check This: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0 to postponed release date 2019

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पवार पोलीस उपनिरीक्षक विशाल पाठोरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युनिअन बँकेत सीसी टीवी फुटेज ची पाहणी केली असता सदरची घटना पारख ठेऊन झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

रखमाजी शिंदे बँकेत असताना त्यांच्या आजू बाजूला संशयित व्यक्ती पारख ठेऊन असल्याचे सी सी टी व्ही फुटेज मध्ये निदर्शनात येत असल्याचे लक्षात येते. सुमारे दहा लाख किमतीचे साडे एकतीस तोळे सोने असलेली पिशवी धूमस्टाईल ने चोरलेली असल्याने शहरामध्ये खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी भेट दिली असून बँकेत आणि घटना स्थळाची त्यांनी पाहणी केली. या पूर्वीही अशा प्रकारच्या घटना या बँकेच्या जवळ घडल्यात. रात्री उशिरापर्यंत या घटनेचे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


पहा: Kaala box office collection


 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here