Home अहमदनगर शिर्डी लोकसभा निवडणूक:गैरसमजात राहू नका, मतदान घडवावे लागणार, आमदार थोरातांचा वाकचौरेना सल्ला

शिर्डी लोकसभा निवडणूक:गैरसमजात राहू नका, मतदान घडवावे लागणार, आमदार थोरातांचा वाकचौरेना सल्ला

Breaking News | Shirdi Lok Sabha Election: उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य मिळेल, असे बोलू नका आणि गैरसमजात राहू नका. मतदान घडवावे लागेल, विजय आपलाच आहे पण काळजी घ्या- आ.बाळासाहेब थोरात.

Shirdi Lok Sabha Election Don't be mistaken, voting will have to happen

संगमनेर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य मिळेल, असे बोलू नका आणि गैरसमजात राहू नका. मतदान घडवावे लागेल, विजय आपलाच आहे पण काळजी घ्या, असे आवाहन काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

आमदार थोरात म्हणाले, इंडिया आघाडीचा कोण पंतप्रधान होणार यावर चर्चा सुरु आहे. कारण भाजपने लोकांना फसवले आहे. महाराष्ट्रात पक्ष फोडले. आमदार पोलिस स्टेशन मध्ये गोळीबार करतात. महाराष्ट्रात महायुतीची परिस्थिती चांगली नाही हे स्वतः भुजबळच बोलून गेले. विखे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, आम्ही गणेश कारखान्याची अर्थव्यवस्था चांगली केली. आता नगर दक्षिणची अर्थव्यवस्था चांगली व्हावी यासाठी आम्ही तिथे गेलो आहे. वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या मंचावर पहिल्या रांगेत त्यांना मान होता. राज्य पातळीवर त्यांना सन्मान होता. काँग्रेसच्या नऊ पदांचा त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा निर्णय चुकीचा आहे. विखेंच्या बंगल्यावर दोन तास त्या थांबल्या. आणि उमेदवारी जाहीर केली. बौद्ध समाजाला उमेदवारी नाही असा अपप्रचार त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र ही जागा शिवसेनेकडे गेल्याने प्रश्नच राहत नाही. उत्कर्षा रूपवते यांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. उमेदवार वाकचौरे म्हणाले, मी थकणारा नाही तर थकवणारा उमेदवार आहे. या मतदारसंघाची खडान खडा माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

खांडगाव येथे वाकचौरे यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रा. यशपाल भिंगे, दादासाहेब मुंडे, थोरात कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहोळ, रणजीत देशमुख, हिरालाल पगडाल उपस्थित होते.

Web Title: Shirdi Lok Sabha Election Don’t be mistaken, voting will have to happen

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here