Home अहमदनगर धक्कादायक!  शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

धक्कादायक!  शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Shirdi News: Student Food Poisioning – अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती.

Shirdi News Student Food Poisoning

शिर्डी: अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास १०० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

रात्री जेवण केल्यानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेली माहिती अशी की,  अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथिल आदर्श हायस्कूल येथील हे विद्यार्थी आहेत. दोन दिवसापासून ते सहलीसाठी निघले होते. शिर्डीत येण्यापुर्वी दुपारचे जेवन केले. त्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतले. रात्री देवगड येथे मुक्कामी निघले असताना मुलांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. यातील काही विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत होता. त्यामुळे शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यातील काही मुलांना ताप, थंडी सारखे प्रकार देखिल दिसून आले. त्यामुळे खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखी खाली ठेवले आहे. मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व बाधित मुलांना सध्या रुग्णालायत दाखल ठेवले आहे. सहलीत २२७ विद्यार्थी आहेत. यातील शंभर मुलांना त्रास झाला आहे. तर काही शिक्षकांना देखिल अन्न विषबाधा सारखी लक्षणे जाणवल्याने त्यांना ही उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: Shirdi News Student Food Poisoning

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here