Home अहमदनगर दोन पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

दोन पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

Shirdi Two policemen were caught red-handed taking bribes

शिर्डी | Shirdi: शिर्डी शहरातील एका हॉटेलवर कारवाई न करण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी यांना दोन हजाराची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई शिर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

पोलीस नाईक बाळासाहेब यशवंत सातपुते वय ३८ व पोलीस हवालदार प्रसाद पांडुरंग साळवे वय ४९(नेमणूक शिर्डी पोलीस ठाणे) अशी या आरोपींची नावे आहेत.

पोलीस नाईक सातपुते याने हवालदार प्रसाद साळवे यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे १७ जानेवारी रोजी पाच हजार रुपयांची मागणी करून पोलीस नाईक सातपुते याने सोमवारी २ हजार रुपयांची लाच घेताना पंच व साक्षीदारसमक्ष स्वीकारत असताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  

Web Title: Shirdi Two policemen were caught red-handed taking bribes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here