Home अहमदनगर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड

Shrirampur Fugitive accused in murder case arrested

श्रीरामपूर | Shrirampur: खुनाच्या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी हॉस्पिटलमधून औषधोपचार घेऊन परत येत असताना पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या पुन्हा नारायणगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत.

श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यातील सचिन नेमाजी काळे रा. मुठेवडगाव ता. श्रीरामपूर हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यात अटकेत आहे. आरोपी सचिनला श्रीरामपूरमध्ये आजारपणामुळे ग्रामीण रुग्णालयात तपासणी व औषध उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथून घेऊन जात असताना श्रीरामपूर ते हरेगाव रस्त्यावर वाहनाचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत तो मागील दरवाजा उघडून बेडीतील हात काढून पळाला. या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेमले होते. त्यानुसार पाठाकातील अधिकारी व कर्मचारी यांनी फरार आरोपीचा शोध घेत असताना कटके यांना फरार आरोपी नारायणगाव येथे राहत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे.  

Web Title: Shrirampur Fugitive accused in murder case arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here