Home Accident News शिवशाही बसला ट्रकची धडक, अपघातानंतर बसमधील भलताच प्रकार उघड

शिवशाही बसला ट्रकची धडक, अपघातानंतर बसमधील भलताच प्रकार उघड

Chhatrapati Sambhajinagar Accident:  ट्रकने शिवशाही बसला धडक दिल्याने हा अपघात.

Shivshahi bus collided with a truck, after the accident

छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवशाही बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. गंगापूर-वैजापूर मार्गावर शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर हा अपघात झाला. ट्रकने शिवशाही बसला धडक दिल्याने हा अपघात झाला.

या अपघातात सुदैवाने कुणीही प्रवाशी जखमी झाले नाहीत. अपघातात बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर गंगापूर-वैजापूर मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला.

अपघातानंतर बसमध्ये सुरु असलेला भलताच धक्कादायक  प्रकार समोर आला. शिवशाही बस कंडक्टरशिवाय धावत होती. कंडक्टर नसल्यामुळे एक प्रवासी इतर प्रवाशांची तिकीटं काढत होता.

प्रवाशाने कॅमेऱ्यासमोर हा सगळा प्रकार अपघातानंतर सांगत होता. मात्र प्रवासी ही तक्रार करत असताना चालकाने त्याला थांबवण्यासाठी त्याच्या हातही उचलला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलीस अधिक  तपास करत आहेत.

Web Title: Shivshahi bus collided with a truck, after the accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here