Home क्राईम संगमनेर: महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून दोन दिवस अत्याचार

संगमनेर: महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून दोन दिवस अत्याचार

Sangamner Crime: एका 19 वर्षीय महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीला तरुणाने बळजबरीने पळवून नेवून तिच्यावर त्याने दोन दिवस अत्याचार (rape) केल्याची घटना.

College girl kidnapped and Rape for two days

संगमनेर: संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस मुलींच्या अत्याचारातील घटनांत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच मामाच्या गावी आलेल्या एका 19 वर्षीय महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीला तरुणाने बळजबरीने पळवून नेवून तिच्यावर त्याने दोन दिवस अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. केशव बबन काळे यअसे या संशियीत आरोपीचे नाव आहे.  तरुणीला आळंदी येथे नेवून लग्न केले, मात्र लग्न करून घरी आल्यानंतर काळे याचे पहिले लग्न झाल्याचे ऐकून तिला मोठा धक्काच बसला. तिने घारगाव पोलिस ठाण्यात जाऊन  त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहरण, अत्याचार व धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील पठार भागात 19 वर्षीय विद्यार्थीनी मामाकडे राहत होती. ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमातील प्लॅटफॉर्मवर तिची केशव बबन काळे या तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटींग व संभाषण सुरू झाले. मंगळवारी तिला फोन करुन तो म्हणाला, ‘तू, माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीही होवू देणार नाही. मी बोलविल्यानंतर तू आली नाही तर तुझ्यासह भावाला ठार मारील, अशी धमकी दिली.

ती महाविद्यालयात जाण्यास निघाली असता केशव काळे दुचाकीवरुन येत, तू माझ्याबरोबर चल, असे म्हणत तिला गाडीवरुन जुन्नर तालुक्यातील काबाडवाडी येथे त्याच्या मामाच्या गावी घेवून गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला, तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी जीव देईल, अशी धमकी दिली. यानंतर बळजबरीने त्याने तिच्याशी लग्न केले. लग्न झाल्यानंतर ते दोघे काळे याच्या कुरकुंडी गावी गेले. तेव्हा त्याचे लग्न झाल्याचे तिला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने भावाशी संपर्क साधून ही माहिती दिली. कुटुंबिय तिला सोबत घेवून गावी आले. तिच्या फिर्यादीवरुन पो. उ. नि. उमेश पतंगे यांनी. केशव बबन काळे (वय 23, रा. कुरकुंडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: College girl kidnapped and Rape for two days

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here