Home Accident News शिवशाही बस- दुचाकीचा भीषण अपघात, ओव्हरटेक जीवावर बेतला

शिवशाही बस- दुचाकीचा भीषण अपघात, ओव्हरटेक जीवावर बेतला

Ahmednagar Beed Highway Accident: ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसला समोरून धडक, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील तरुणाचा मृत्यू.

Shivshahi bus- two wheeler horrific accident one death

बीड:  बीड-नगर महामार्गावरील धानोरा जवळ दुचाकीस्वाराचा ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या शिवशाही बसच्या समोरासमोर धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. मृताचे नाव रामदास मिसाळ (वय ४८ ) असे असून तो जामखेड (Jamkhed) तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  रामदास मिसाळ हे जामखेडवरून नगरकडे दुचाकीवरून ( क्र. एम.एच १६, ए.के.२४३१) जात होते. बीड-नगर महामार्गावरील धानोराजवळ दुचाकीवरील मिसाळ समोरील गाडीला ओव्हरटेक करत होते.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

याच दरम्यान, पुण्यावरून नांदेडला जात असलेली शिवशाही बस (क्र. एम.एच.०९, ए.एफ.९७४९) समोरून आली. यावेळी दुचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार रामदास मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Shivshahi bus- two wheeler horrific accident one death

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here