Home संगमनेर संगमनेरात नियमांचे उल्लंघन केल्याने ही तीन दुकाने सील  

संगमनेरात नियमांचे उल्लंघन केल्याने ही तीन दुकाने सील  

shops were sealed for violating the rules at Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलत कारवाईचा बडगा हाती घेतला आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आढावा बैठकीतून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश दिल्याने शहरातील चंदुकाका सराफ ज्वेलर्स, प्रवरा मेडिकल,हॉटेल राजबक्षी यांच्यावर कारवाई करत सील करण्यात आले आहे. या दुकानांनी मालकांसह कर्मचारी विना मास्क आढळून आल्याने प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे , तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहायक फौजदार रावसाहेब कदम यांनी ही कारवाई केली आहे.

तसेच संगमनेर शहर व तालुका विभागात दुकानदार व ग्राहक यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईच्या सूचना प्रशासनाने जाहीर केल्या आहे.

Web Title: shops were sealed for violating the rules at Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here