Home अहमदनगर शेतीच्या वादातून एकाचा मृत्यु, मृतदेह चार तास पोलीस ठाण्यात

शेतीच्या वादातून एकाचा मृत्यु, मृतदेह चार तास पोलीस ठाण्यात

Shevgaon Death of one in a farm dispute

शेवगाव | Shevgaon: शेवगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून मारहाण झाली. या वादात एकाचा मृत्यू झाल्याने या मृत्यूस कारणीभूत असलेल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी त्या व्यक्तीचा मृतदेह चार तास शेवगाव पोलीस ठाण्यात आणल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी घडली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरच मृतदेह नातेवाईकानी ठाकूर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले. हरिभाऊ पांडुरंग बदडे वय ४० रा. ठाकूर पिंपळगाव असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, ठाकूर पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून हरिभाऊ बदडे यांना त्यांच्याच नात्यातील काही व्यक्तींनी शुक्रवारी मारहाण केली होती. चर्चेतून हे प्रकरण मिटले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी हरिभाऊ घरी येत असताना त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर ते घरी जाऊन झोपले सकाळी त्यांना उठविण्याचा प्रयत्न घरातील लोकांनी केला मात्र ते उठले नाही. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शावविचेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला. मारहाण करणाऱ्या संभंधित व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात या मागणीसाठी नातेवाईक यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला.  

Web Title: Shevgaon Death of one in a farm dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here