Home क्राईम भावी पतीला फोटो दाखवतो धमकी देत तरुणीवर अत्याचार

भावी पतीला फोटो दाखवतो धमकी देत तरुणीवर अत्याचार

Shows photo to future husband, abuses young woman

नांदेड: प्रेमसंबंध असताना एकत्र काढलेले फोटो भावी नवऱ्याला दाखविण्याची धमकी देत एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना माहूर तालुक्यातील साकुर येथे घडली. आरोपीला माहूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर तरुणी ही शिक्षणासाठी किनवटला ये जा करीत होती. घराच्या शेजारी राहणाऱ्या प्रदीप अवधूत तांबारे वय २२ याच्यासोबत दोन वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यावेळी प्रदीपने मोबाइलवर घेतले होते. एक महिन्यापूर्वी गावाशेजारील एका तरुणासोबत या तरुणीचे लग्न जमले. हे प्रियकर तरुणाला समजल्यानंतर प्रदीपने एकत्र काढलेले फोटो भावी नवऱ्याला दाखविण्याची धमकी देऊन त्याने खरबी गावाजवळील पुलावर दुचाकी थांबवून पुलाखाली तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान तरुणीच्या भावी नवऱ्याला ही बाब समजली असून त्याने ४ एप्रिल रोजी लग्न मोडले. या घटनेस प्रदीप कारणीभूत असल्याची फिर्याद तरुणीने माहूर पोलीस ठाण्यात दिली असून प्रदीपवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप यास अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Shows photo to future husband, abuses young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here