Home श्रीगोंदा लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच नवरी प्रियकराबरोबर दागिने घेऊन फरार

लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच नवरी प्रियकराबरोबर दागिने घेऊन फरार

Shrigonda bride fled with her boyfriend carrying jewelry

श्रीगोंदा(Shrigonda): श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका तरूणाबरोबर लग्न झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच नवरीने दीड लाखाचे सोने घेऊन प्रियकरासोबत धूम ठोकत प्रियकराबरोबर लग्न केले.

बारामती येथील तरडोली गावातील एका मुलीचे बाबुर्डी येथील एका तरूणाबरोबर लग्न झाले होते. वैष्णवी या तरुणीचे बाबुर्डी येथील एका तरूणाबरोबर २५ जूनला लग्न झाले. त्यानंतर ती ११ जुलैला प्रियकरासोबत फरार झाली. ती लग्नाचे दीड लाखाचे दागिने घेऊन पसार झाली आणि वैष्णवीने आळंदीत प्रियकर संदेश सोबत लग्न केले.

बाबुर्डी येथील तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून वैष्णवी संदेश शिंदे व संदेश नंदकिशोर शिंदे रा. तरडोली ता. बारामती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Shrigonda bride fled with her boyfriend carrying jewelry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here