Home क्राईम सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले  

सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले  

Shrigonda government official was caught red-handed taking a bribe

श्रीगोंदा | Shrigonda : श्रीगोंदा तालुक्यात सहायक निबंधक कार्यालयातील एका अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापूसाहेब खंडेराव शिवरकर वय ४८ स्टेशन रोड, श्रीगोंदा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सावकार विरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी बापूसाहेब शिवरकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी सावकार विरोधात दिलेल्या तक्रारी वरून कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी करत १० हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस उपधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करंडे या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Shrigonda government official was caught red-handed taking a bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here