Home श्रीगोंदा Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील सात पोलीस करोनाबाधित

Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील सात पोलीस करोनाबाधित

Shrigonda taluka 7 police corona Positive

श्रीगोंदा | Shrigonda: जिल्ह्यात करोनाचा विळखा सुरूच आहे. यामध्ये करोना योद्धा देखील सुटलेले नाहीत. करोनाचे संक्रमण हे वाढतेच आहे. पोलीस कर्मचारी त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय यांची तपासणी करण्यात आल्यानंतर देखील संख्या वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांत श्रीगोंदा येथील उपकारागृहात ३६ आरोपींना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर पोलीस कर्मचारी यांची देखील करोना चाचणी करण्यात आली होती.

आरोग्य विभागाने सर्व पोलीस कर्मचारी यांची तपासणी करून घ्यावेत अशी सुचना करण्यात आली होती. त्यानुसार २५ कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये सात कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर ४०  जणांची चाचणी करणे अजून बाकी आहे.  
तसेच या कर्मचारी वर्गाच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात येणार असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Shrigonda taluka 7 police corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here