Home श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसांत दोन करोनाचे बळी

श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसांत दोन करोनाचे बळी

Shrigonda taluka death by corona

श्रीगोंदा(Shrigonda): श्रीगोंदा तालुक्यात करोनाबाधितानी शतक पार केले आहे. सोमवारी श्रीगोंदा तालुक्यात करोनाचा पहिला मृत्यू झाला असता आज मंगळवारी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे,

सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या कुटुंबांपैकी ३० वर्षीय तरुणावर जिल्हा रूग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच शरीराकडून उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचा सोमवारी मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबातील पती पत्नी व २ मुले असे सर्व जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे या कुटुंबियांना उपचाराकरीता श्रीगोंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात दाखल करण्यात आले होते. यातील वडिलांना जास्त त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 

आज मंगळवारी तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे दगावला आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना मृत्यूची संख्या दोन झाली आहे. दोन दिवसांत दोन मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Shrigonda taluka death by corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here