Home संगमनेर करोना कहर: संगमनेर तालुक्यात आज तब्बल ५१ करोनाबाधित

करोना कहर: संगमनेर तालुक्यात आज तब्बल ५१ करोनाबाधित

Coronavirus Sangamner Taluka 51 corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात शहर व ग्रामीण भागात खासगी व शासकीय अहवालानुसार दिवसभरात  तब्बल ५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ६४९ वर पोहोचली आहे.

संगमनेर तालुक्यात सकाळी ३४ रुग्णांची भरपडली आहे. प्राप्त झालेल्या शासकीय अहवालानुसार चंद्रशेखर चौक २७ वर्षीय तरुण, मेनरोड ६५ वर्षीय महिला, इस्लामपुरा २७ वर्षीय तरुण, पावाबाकी रोड ५५ वर्षीय पुरुष, ९ वर्षीय बालक, कोष्टी गल्ली २४ वर्षीय महिला, कुरण रोड ४० वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगाही करोनाबाधित आढळून आला आहे.

संगमनेर तालुक्यात आश्वी बुद्रुक येथे ८१ वर्षीय पुरुष, ६३ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, निमगाव पागा ६८ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, १८ वर्षीय तरुण, शेडगाव येथे ५८ वर्षीय महिला, ३७ व २३ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, २५ वर्षीय तरुण,१७ वर्षीय मुलगी करोनाबाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळा अहवालात कुंभारआळा येथे ४८ वर्षीय व्यक्ती, रंगारगल्ली येथे ५४ वर्षीय व्यक्ती, जेधे कॉलनीत ४२ वर्षीय महिला, माळीवाडा येथे ६८ वर्षीय व्यक्ती, ५४ वर्षीय महिला, जोर्वे रोड येथे ५१ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली आहे.

खासगी प्रयोगशाळेतून तालुक्यात नांदूर खदरमाळ येथे गोकुळवाडीत ५४ वर्षीय पुरुष, खांडगाव ५५ वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी ५७ वर्षीय पुरुष, शेडगाव ४८ वर्षीय पुरुष यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे एकूण ३४ करोनाबाधित आढळून आले आहेत.  

संगमनेर तालुक्यात आज सायंकाळी १७ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अहवालानुसार सुतारगल्ली येथे २३ वर्षीय तरुण, विद्यानगर ८२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, घोडेकर मळा २ वर्षीय मुलगी, १६ वर्षीय तरुण, महात्मा फुलेनगर ५७ वर्षीय पुरुष, पावबाकी रोड ४४ वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे.

संगमनेर तालुक्यात खराडी येथील २२ वर्षीय तरुण, रायते येथील ३९ वर्षीय महिला, निमगाव पागा येथे १९ वर्षीय तरुण, दाढ बुद्रुक येथे २२ वर्षीय महिला, पावाबाकी येथे ४० वर्षीय तरुण, पेमगिरी येथे २ वर्षीय, १४ वर्षीय मुलगा, ४०,३२ वर्षीय तरुण,  ५८ वर्षीय महिला या रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६४९ झाली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner Taluka 51 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here