Home श्रीगोंदा ट्रक चालकाला चौघांनी अडवून लुटले, गुन्हा दाखल

ट्रक चालकाला चौघांनी अडवून लुटले, गुन्हा दाखल

Shrigonda truck driver was stopped and robbed by four people  

श्रीगोंदा | Shrigonda: दिवसा लुट होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. नुकताच श्रीगोंदा तालुक्यात ट्रक लुटीचा प्रकार घडला आहे.

अकलूजमधून दौंड नगर महामार्गावरून नगरकडे साखर पोते घेऊन जात असताना श्रीगोंदा तालुक्यात काष्टी येथे कॉलेजच्या जवळ ११ वाजेच्या सुमारास एका ट्रकला चार जणांनी अडवून ट्रक चालक समरत बेरुलाल धनगर मध्यप्रदेश यांच्याजवळील ७३ हजार रुपये लुटीची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.   

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशमधील समरत धनगर हा ट्रक चालक गाडीत साखर पोते घेऊन जात असताना पाठीमागून दोन दुचाकी आल्या. या चार चोरट्यांनी ट्रक बाजूला लावण्यास सांगितले. त्यामधील दोघांनी ट्रकची तपासणी करायचे आहे असे सांगितले.

त्यांनी कॅबीनमधील ७३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि मोटारसायकलने ते दौंडच्या रस्त्याने निघून गेले. याप्रकरणी ट्रक चालकाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव डीकले करत आहे.

Web Title: Shrigonda truck driver was stopped and robbed by four people  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here