Home श्रीगोंदा ट्रकची बसला पाठीमागून धडक, ३४ प्रवासी बचावले

ट्रकची बसला पाठीमागून धडक, ३४ प्रवासी बचावले

Shrigonda truck hit the bus from behind rescuing 34 passengers

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारात ट्रकने बसला पाठीमागून दिलेल्या धडकेने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, घारगाव परिसरात बस डेपो च्या जवळच अंतरावर नगर दौंड रोडवर ट्रक याने पाठीमागून महामंडळाची बसला जोराची धडक दिली. सदर ट्रक हा गव्हाचे पोते घेऊन मिरज येथे चालला होता. बस फलटण डेपोची असून मलकापूर वरून फलटणला चालली होती.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या बसमध्ये ३४ प्रवासी होते. सर्वजण बचावले आहेत. यामधील चालक व वाहक दोन्ही थोडक्यात बचावले आहे.

Web Title: Shrigonda truck hit the bus from behind rescuing 34 passengers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here