Home संगमनेर संगमनेर: विजेचा धक्का बसलेल्या कंत्राटी कामगाराचा अखेर मृत्यू

संगमनेर: विजेचा धक्का बसलेल्या कंत्राटी कामगाराचा अखेर मृत्यू

Sangamner Contract worker dies after electric shock

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे वीज खांबावर काम करीत असताना देवकौठे येथील कंत्राटी वीज कामगार निवृत्ती शंकर मुंगसे वय ३२ यांना अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागून ते खांबावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाले होते.

याबाबत माहिती अशी की,  देवकौठे येथील निवृत्ती शंकर मुंगसे कंत्राटी वीज कामगार म्हणून कार्यरत होते. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अधिकृतपणे इलेक्ट्रिक बंद करून ते पारेगाव बुद्रुक शिवारात वीज खांबावर चढून काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का लागला व ते खांबावरून कोसळले तेव्हापासून ते बेशुद्ध अवस्थेत होते.  

ही घटना घडल्यापासून निवृत्ती मुंगसे यांच्यावर बेशुद्ध अवस्थेत नाशिक येथील खासगी रुग्णालयात सहा दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनने देवकौठे गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Sangamner Contract worker dies after electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here