Home अहमदनगर घारगाव येथे अपघातात तरुणाचा मृत्यू तर एक जखमी

घारगाव येथे अपघातात तरुणाचा मृत्यू तर एक जखमी

Shrigonda youth was killed and another injured in an accident at Ghargaon

Ahmednagar | Shrigonda | श्रीगोंदा: नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव ता. श्रीगोंदा येथे दुभाजकाला धडकून जंगलेवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री हा अपघात (Accident) घडला.

अनिकेत जालिंदर जंगले वय २४ रा, जंगलेवाडी ता. श्रीगोंदा असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  रोहित परशुराम गोडे असे या गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

अनिकेत व रोहित हे नगरला गेले होते. ते घरी परतत असताना घारगाव शिवारात हा अपघात घडला. अनिकेत हा एकुलता एक मुलगा होता. रविवारी दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे.

Web Title: Shrigonda youth was killed and another injured in an accident at Ghargaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here