Home अहमदनगर अहमदनगर: बारावीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत आढळला मृतदेह

अहमदनगर: बारावीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत आढळला मृतदेह

Rahata body of a 12th standard student was found in a well

Ahmednagar | Rahata | राहता: राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावातील इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी निखील संजय तासकर हा ३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता. रविवारी या विद्यार्थ्याचा कोऱ्हाळे येथील राहत्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला.

निखील हा बारावी कला शाखेत शिक्षण घेत होता. या घटनेबाबत बबलू हरिभाऊ बनकर यांनी पोलिसांना खबर दिली. बनकर हे जनावरांना पाणी आणण्यासाठी विहिरीकडे गेले होते. त्यावेळी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती समजताच राहता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल नरोडे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे हे करीत आहे.  

Web Title: Rahata body of a 12th standard student was found in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here