ब्रेकिंग: राज्यात सातबारा उतारे होणार बंद, महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
मुंबई | Mumbai: शहरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने शहरांत शेतजमीन शिल्लक राहत नसल्याने सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याऐवजी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
वाढत असलेल्या शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी शेतजमीन उरलेली नाही आहे. तसेच अनेक शहरांतील शेतजमीन जवळपास संपत आल्याची स्थिति निर्माण झाली आहे. त्यामुळे या शहरांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे, आता सातबाऱ्यांचे रूपांतर प्रॉपर्टी कार्डमध्ये झाले असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सात बारा (Seventeen excerpts) कायम ठेवला जातो, त्यामुळे फसवणुकीसारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे सर्व शहरांतील सात बारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासोबत सांगली, मिरज, नाशिकपासून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो राज्यभरात राबविण्यात येणार आहे. सिटी सर्व्हे झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक आहे. तरीदेखील सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत.
Web Title: Seventeen excerpts will be closed in the state