Home अहमदनगर Murder: दारूच्या नशेत मित्राचा खून

Murder: दारूच्या नशेत मित्राचा खून

Shrirampur Friend Murder

श्रीरामपूर | Murder Case: वडाळा महादेव परिसरातील ससे वस्तीवर राहत असणाऱ्या राजू निवृत्ती कसबे वय ४५ या मजुराचा मित्रानेच खून केल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राजू कसबे याचा राहत्या घरात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत  आढळून आला होता.  त्याचा मित्र जैकी ओहोळ या मित्रानेच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत त्यांच्यात भांडणे झाली. त्यातीन ओहोळ याने डोक्यात काहीतरी मारून व गळा दाबून जागीच ठार केले.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात त्यांचे बांधी  अमोल कसबे यांनी फिर्याद दिली आहे.  डोक्यात काहीतरी मारून व गळा दाबून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.  पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान सुरवाडे हे करीत आहे.

Web Title: Shrirampur Friend Murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here