Home Accident News Accident: पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident: पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

Shrirampur Young man killed in pickup and bike accident 

श्रीरामपूर | Accident | Shrirampur: श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे पिकप आणि दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंधवणी गावाजवळ असलेल्या बाबा पेट्रोल पंपाजवळ खैरी निमगाव कडे जाणाऱ्या पिकप आणि मोटारसायकलचा अपघात घडला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काळ सायंकाळच्या सुमारास खैरी निमगाव येथील पिकअप बाबा पेट्रोल पंपासमोर आले असता पांडुरंग गणपत काळे हा अचानक वळल्याने पिकअपची जोरदार धडक मोटरसायकलला बसली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पांडुरंग हा सामाजिक कार्यकर्ते गणपत काळे यांचा मुलगा होता. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Shrirampur Young man killed in pickup and bike accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here