Home क्राईम धक्कादायक! जावयानेच केला सासूवर अत्याचार, पोलिस फरार जावयाच्या शोधात

धक्कादायक! जावयानेच केला सासूवर अत्याचार, पोलिस फरार जावयाच्या शोधात

Jalana Crime:  दारूच्या नशेत ३८ वर्षीय जावयाने ६५ वर्षीय वृद्ध सासूवर अत्याचार (Abused) केल्याची धक्कादायक घटना.

son-in-law abused the mother-in-law

जालना: दारूच्या नशेत ३८ वर्षीय जावयाने ६५ वर्षीय वृद्ध सासूवर अत्याचार केल्याची घटना चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या जावयाचा पोलिस शोध घेत आहेत.

चंदनझिरा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात एक ६५ वर्षीय महिला आपल्या मुलीकडे राहते. पीडित महिलेची मुलगी व जावई एका शेतात राखणदार म्हणून काम करतात. बुधवारी रात्री पीडित वृद्ध महिलेची मुलगी नातेवाइकांकडे गेली होती, तर पीडित महिला घराबाहेर झोपली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास पीडित महिलेचा जावई हा दारूच्या नशेत घरी आला. वासनांध झालेल्या जावयाने झाडाखाली झोपलेल्या वृद्ध सासूवरच अत्याचार केला. वृद्धेने प्रतिकार करण्याच्या प्रयत्न केला असता, तिला मारहाण केली. सकाळी हा प्रकार पीडित महिलेने घरी आलेल्या आपल्या मुलीला सांगितला.

Web Title: son-in-law abused the mother-in-law

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here