Home कोल्हापूर Robbery: पिस्तुलाच्या गोळ्या झाडून नेले तीन किलो सोने 

Robbery: पिस्तुलाच्या गोळ्या झाडून नेले तीन किलो सोने 

Kolhapur:  बस स्टॉपजवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा (robbery) टाकून सुमारे पावणेदोन कोटींचे तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास  केल्याची घटना.

robbery Three kilos of gold were taken away with pistol bullets

कोल्हापूर: बालिंगा (ता. करवीर) येथे बस स्टॉपजवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे पावणेदोन कोटींचे तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात ज्वेलर्सचे मालक रमेश शंकरजी माळी (वय ४०, सध्या रा. बालिंगा, मूळ रा. राजस्थान) आणि त्यांचा मेहुणा जितू मोड्याजी माळी (३०, रा. बालिंगा) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेदरम्यान दुकानात असलेला १३ वर्षांचा मुलगा पीयूष रमेश माळी हा प्रसंगावधान राखून स्ट्रॉंगरूममध्ये लपून बसल्याने बचावला.

दुपारी दोनच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते, तर दुसऱ्याने रूमालाने चेहरा झाकला होता. आत शिरताच त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सर्व दागिने दोन पिशव्यांमध्ये भरण्यास सांगितले. दुकानाचे मालक माळी यांनी प्रतिकार करताच एका दरोडेखोराने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्याने पिस्तुलाच्या गोळ्या झाडून दुकानातील कपाटांच्या काचा फोडल्या. सुमारे ४० ट्रेमधील तीन किलो दागिने आणि दीड लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. दोन दुचाकींवरून चौघे गगनबावड्याच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Web Title: robbery Three kilos of gold were taken away with pistol bullets

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here