बैलगाडी शर्यतीत गाडीचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू
Satara: बैलगाडी शर्यती पहात असताना गाडीची धडक बसून गाडीचे चाक अंगावरून गेल्यामुळे एका तरुणाचा अपघाती मृत्यू (Accident).
नागठाणे | सातारा: नागठाणे (ता. सातारा) येथे बैलगाडी शर्यती पहात असताना गाडीची धडक बसून गाडीचे चाक अंगावरून गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झाला.
बिरेंदर सिंग (वय ३२, सध्या (रा. बोरगाव, ता. सातारा मूळ रा. पंजाब) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. उपांत्य फेरीतील शर्यतीदरम्यान बिरेंदर सिंग सीमारेषेजवळ उभा होता. शर्यतीच्या गाड्या सुटल्या. त्यावेळी अतिवेगाने आलेल्या बैलगाडीची सिंग यांच्या तोंडास जोराची धडक बसली, ही धडक इतकी भीषण होती की, सिंग हा त्याच ठिकाणी कोसळला. त्याचवेळी छकड्याचे चाक त्याच्या तोंडावरून गेल्यामुळे सिंग याचा जबडा फाटला.
Web Title: Accident youth died when the wheel of the car ran off him in the bullock cart race
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App